Ad will apear here
Next
‘पंतप्रधानांनी देशातील राजकीय कार्यसंस्कृती बदलली’
अनिल शिरोळेंच्या कार्य अहवालाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन


पुणे : ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील संपूर्ण राजकीय कार्यसंस्कृती बदलली आहे. यापूर्वी निर्णय न घेणे हाच मोठा निर्णय आणि धोरणलकवा हीच देशाची अवस्था होती. ‘गरिबी हटाओ’चा नारा देऊन लोक कित्येक निवडणुका जिंकले; पण गरिबांसाठी कधीच काम केले नाही. मोदींनी आणलेल्या कार्यसंस्कृतीत देशातील गरिबाच्या जीवनात परिवर्तन आणण्याच्या दृष्टीने प्रथम विचार केला गेला,’ असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.     

खासदार अनिल शिरोळे यांच्या गेल्या साडेचार वर्षांच्या कार्याच्या अहवालाचे प्रकाशन फडणवीस यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. या वेळी राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट, सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, राज्यसभेचे खासदार संजय काकडे, भाजपचे शहराध्यक्ष योगेश गोगावले, आमदार माधुरी मिसाळ, मेधा कुलकर्णी, विजय काळे, भीमराव तापकीर, जगदीश मुळीक, पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

मुख्यमंत्र्यांनी शिरोळे यांच्या खासदारकीच्या कारकीर्दीचे कौतुक करून पुण्याच्या विकासासंबंधीच्या विविध योजनांना राज्य व केंद्र सरकारचा भक्कम पाठिंबा असल्याचा पुनरुच्चार केला व त्यासंबंधित दाखलेही दिले.  

शिरोळे यांच्याबद्दल बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, ‘शिरोळे हे मितभाषी असले, तरी दृढ स्वभावाचे आहेत. कोणतेही काम पूर्ण करण्यासाठी ते सातत्याने पाठपुरावा करतात. एक स्वच्छ, निर्मळ प्रतिमा त्यांनी जपली आहे. एक सच्चा प्रामाणिक माणूस म्हणून त्यांचे वर्णन करता येते. राजकारणात ज्यांनी ४० वर्षे काम केले अशा व्यक्तीने अशी प्रतिमा जपणे अत्यंत महत्त्वाचे आहे.’

‘खासदारांनी देशाच्या संचलनाच्या, विकासाच्या चर्चांमध्ये व धोरणनिर्मितीत सहभागी व्हायला हवे अशी आपली प्राथमिक अपेक्षा असते; परंतु ज्यांना आपण लोकप्रतिनिधी म्हणून निवडून पाठवतो त्यातील अनेकजण सभागृहात महत्त्वाचे विषय सुरू असताना कँटीनला बसलेले असतात किंवा कुठेतरी फिरत असतात अशी दुर्दैवी स्थिती अनेकदा दिसून येते,’ असा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला.

अनिल शिरोळे हे, मात्र संसदेत कायमच पूर्णवेळ उपस्थित असतात आणि पुणे शहर व देशासंबंधीचे प्रश्नही मांडत असल्याचे त्यांनी या वेळी नमूद केले. खासदार संजय काकडे, पालकमंत्री गिरीश बापट यांनीही शिरोळे यांच्या मितभाषी, परंतु पाठपुरावा करण्याच्या स्वभावाचे कौतुक केले.

शिरोळे यांच्या कार्यकाळात त्यांनी सादर केलेला हा दुसरा कार्य अहवाल आहे. या वेळी बोलताना ते म्हणाले, ‘पूर्वी केवळ स्वप्नवत वाटणारी मेट्रो तसेच पीएमआरडीए, लोहगाव विमानतळाचे विस्तारीकरण, परवडणारी घरे अशी अनेक विकासकामे आता शहरात प्रत्यक्षात दिसू लागली आहेत. मुख्यमंत्र्यांची पुण्याच्या संदर्भातील सकारात्मक निर्णयांची संख्या पाहता तेही पुणेकरच आहेत असे म्हणावे लागेल.’
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/VZRUBU
Similar Posts
‘सीएम चषक खेळातील क्रांतीचा नवीन इतिहास रचेल’ अटल क्रीडा नगरी (पुणे) : ‘महाराष्ट्रातल्या क्रीडा प्रतिभेला शोधून त्यांना मोठा मंच देण्याच्या दिशेने सीएम चषक नवीन अध्याय लिहील; तसेच युवा पिढीत संघटन, सह अस्तित्व आणि सहकाराचा भाव निर्माण करण्याच्या दिशेनेसुद्धा हे आयोजन लक्षणीय ठरेल,’ असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे येथे व्यक्त केला
‘पुणे सिलिंडरमुक्त करण्याचा ‘एमएनजीएल’चा निर्धार’ पुणे : ‘पुण्याला सिलिंडरमुक्त करण्याचा निर्धार महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडने (एमएनजीएल) केला असून, भारतात २०२०पर्यंत दोन कोटी घरांपर्यंत पोचण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न आहे,’ असे ‘एमएनजीएल’चे संचालक राजेश पांडे यांनी सांगितले.
पुणे येथे महा-योजना शिबिराचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन पुणे : आमदार प्रा. मेधा कुलकर्णी यांच्या पुढाकाराने कोथरूड मतदारसंघातील आयोजित करण्यात आलेल्या महा-योजना शिबिराचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले.
राज्यव्यापी अधिवेशनाची तयारी अंतिम टप्प्यात पुणे : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियातर्फे (आठवले गट) आयोजित राज्यव्यापी अधिवेशनाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. एसएसपीएमएसच्या मैदानावर होणाऱ्या या अधिवेशनासाठी भव्य मंडप उभारला जात असून, राज्यभरातून लाखो रिपब्लिकन कार्यकर्ते २७ मे २०१८ रोजी पुण्यात दाखल होत आहे. रविवारी सायंकाळी चार वाजता केंद्रीय राज्यमंत्री

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language